loader image
[ays_poll id=7]

सामाजिक बांधिलकी जपत मनमाडच्या बेदमुथा परिवाराने ६८ रूग्णोपयोगी साहित्याची भेट देत साजरा केला अनोखा वाढदिवस

Apr 22, 2023


मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री नंदलालजी बिरदीचंदजी बेदमुथा यांचे 68 व्या जन्मदिनाच्या औचित्य साधून मनमाड शहर व परिसरात नित्य व निःस्वार्थ रुग्ण सेवा करणाऱ्या सेवाव्रती आनंद सेवा केंद्रास सुमारे एक लाख रुपये किंमती च्या 68 रुग्ण उपयोगी साहित्याची समर्पण भेट देण्यात आली.मनमाड शहरातील प्रसिद्ध व्यापारी नंदलालजी बेदमुथा यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने सामाजिक ऋणानुबंध व बांधिलकी जपत शैलेश बेदमुथा , कल्पेश बेदमुथा आणि बेदमुथा परिवारा तर्फे गत 18 वर्षा (दीड तप )पासून मनमाड शहरात अविरत पणे नित्य व निःस्वार्थ रुग्ण सेवा, रक्तदान शिबीर,आयोजन करणाऱ्या सेवाव्रती आनंद सेवा केंद्राला 68 रुग्ण उपयोगी वस्तू समर्पित भेट देण्यात आल्या या निमित्त आयोजित कार्यक्रमच्या मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मनमाड जैन श्रावक संघा चे संघपती रिखबशेठ ललवाणी, प्रसिद्ध उद्योगपती पोपटशेठ सुराणा, उद्योगपती सुभाषसेठ बेदमुथा सत्कार मूर्ती नंदलालजी बेदमुथा, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटिल, नामको बँक संचालक सुभाषभाऊ नहार, प्रसिद्ध उद्योगपती सुनील भाऊ कासलीवाल, विश्वस्त संजय ललवाणी, मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, माजी नगरसेवक अमजद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद सेवा केंद्रा चे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक कल्पेश बेदमुथा यांनी केले. नंदलालजी बेदमुथा यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने कोणताही राजकीय सामाजिक स्वार्थ न ठेवात आयोजित केलेल्या या सेवा उपक्रमाचे, व आनंद सेवा केंद्रा च्या आरोग्य सेवा कार्याचे यथोचित कौतुक नितीन पांडे, नरेश गुजराथी, संदीप देशपांडे, डॉ सुनील बागरेचा, सुभाष नहार,राजेंद्र पारिक, संदेश बेदमुथा आदी मान्यवर वक्त्यांनी आपले मनोगतातून केले तर संघपती रिखबशेठ ललवाणी यांनी आनंद सेवा केंद्र हे कोणताही भेदभाव न करता मात्र लोक कल्याण म्हणून सर्व धर्म, सर्व पंथ यांचे साठी करीत असलेल्या आरोग्य सेवा कार्याचा गौरव करीत बेदमुथा परिवारा च्या सेवा कार्या बद्दल ऋण व्यक्त केले सत्कार मूर्ती नंदलाल बेदमुथा व सर्व मान्यवराचे हातून फीत कापून सुमारे एक लाख रुपये पेक्षा जास्त किंमती चे 68 रुग्ण उपयोगी साहित्य वस्तू (कमोड चेअर, वॉकर, बेड, आदि )चे लोकार्पण करण्यात आले यावेळी हे रुग्ण साहित्य मोफत रुग्णा पर्यंत ने आण करणाऱ्या हिरामण सोनवणे एकनाथ पवार, प्रकाश खताळ, आदित्य पवार आदी चा सत्कार मान्यवराचे हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला सुरेशशेठ लोढा, कांतीलाल लुणावत, सुनीलशेठ भंडारी, बाळूकाका हिरण, रमेशअण्णा हिरण , किसनदादा बंब, संजूभाऊ चोपडा, राकेश ललवाणी,उमेश ललवाणी,मदन लुणावत, संजूभाऊ मुथा, गुलाब बुरड,मनोज छाबडा,परेश राका,अजित बरडीया,विजूशेठ बरडीया, ठाकुरसिंग गोहिल,बाळू भंडारी,नाबेडा सर, शांतीकाका गांधी,संजूभाऊ आबड, जितुभाऊ चोरडिया,मुन्नाभाऊ ललवाणी, राजाभाऊ ताथेड,दिनेश बेदमुथा,अक्षय सानप, सचिन व्यवहारे,अमित लोढा,नईम खान,रिजवान खान, सचिन जैन, गोपी कौराणी, मुक्तार शेख,जमील सय्यद,बापू जोशी, बेदमुथा परिवार तील पोपटशेठ बेदमुथा,प्रकाश बेदमुथा,विजूशेठ बेदमुथा,रतीबशेठ बेदमुथा,दिलीप बेदमुथा,साहेबचंद बेदमुथा, कैलास बेदमुथा, गौतम बेदमुथा, मनोज बेदमुथा,सचिन बेदमुथा, , नितीन बेदमुथा, हार्दिक बेदमुथा, आदी प्रमुख मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन
आनंद सेवा केंद्रातर्फे
कल्पेश बेदमुथा, योगेश भंडारी,दिपक शर्मा, नितीन आहेरराव, संजय गांधी,विनय सोनवणे, चेतन संकलेचा,ललित धांदल,अनुप पांडे,प्रमोद भाबड,देवेंद्र मुळे आदींनी केले बेदमुथा परिवारा तर्फे सामाजिक ऋण फेडणे चे भान राखत आयोजित केलेल्या या अभिनव /अनोख्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाचे मनमाड शहारात सर्व स्तरा तून कौतुक होत आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.