loader image
[ays_poll id=7]

आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थिनींनी पटकावले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ….

Apr 24, 2023


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडच्या रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींच्या संघाने मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सदर स्पर्धा ही रसायनशास्त्र या विषयाची असुन या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण 16 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता, त्यात मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वाती काकड (तृतीय वर्ष विज्ञान), मृणाल संसारे (द्वितीय वर्ष विज्ञान) व शुभांगी पाटील (प्रथम वर्ष विज्ञान) यांच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.विजयी संघाला ट्रॉफी, सर्टिफिकेट्स व रोख बक्षीसे देण्यात आले. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी एस देसले, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. रोहित शिंदे, कुलसचिव श्री समाधान केदारे व रसायनशास्त्राच्या सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले. जेएटी महाविद्यालय मालेगाव व येवला महाविद्यालय यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.