loader image
[ays_poll id=7]

नांदगाव चाळीसगाव दऱम्यान पिंपरखेड येथे रेल्वे इंजीन बंद

Apr 27, 2023


नांदगाव – सोमनाथ घोंगाणे
नांदगाव-चाळीसगांव दरम्यान पिंपरखेड ( नस्तनपुर ) येथील  रेल्वे गेट जवळ रेल्वे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल  अर्धा ते पाऊणतास  काळ ठप्प झाली होती.  तसेच गेटच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

नांदगाव-चाळीसगांव दरम्यान पिंपरखेड ( नस्तनपूर ) येथील  रेल्वे गेट  जवळ रेल्वे इंजिनमध्ये दुपारी 12.30च्या दरम्यान तांत्रिक बिघाड   झाल्यामुळे गेटच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चाळीसगावहून ,नांदगाव , संभाजीनगरकडे या   मार्गाने मोठी वाहतूक होत असते या मार्गावर खूप रहदारी असते. सध्या कन्नड घाटाचे काम चालू असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहतूक ठप्प झाली होती.. रेल्वे गेटच्या  दोन्ही बाजूला वाहने अडकून पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच नांदगाव ला  कांदा घेऊन जाणारे ट्रॅक्टर, पिकअप, शालेय बस, विद्यार्थी, नागरिक अशा अनेक प्रवाशांचे हाल झाले. दुचाकीस्वार रेल्वेपुलाच्या खालून नदीपात्रातून तर काही लोक  जीव धोक्यात घालून पर्यायी मार्गाने वाहन काढून मार्गस्थ होत होते.  तब्बल पाऊण -एक तासाने गेट उघडल्याने त्यात पुन्हा काही बेशिस्त चालकांची वाहने घुसवल्याने खोळंबा झाला होता.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.