Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव चाळीसगाव दऱम्यान पिंपरखेड येथे रेल्वे इंजीन बंद

Apr 27, 2023

नांदगाव – सोमनाथ घोंगाणे
नांदगाव-चाळीसगांव दरम्यान पिंपरखेड ( नस्तनपुर ) येथील  रेल्वे गेट जवळ रेल्वे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल  अर्धा ते पाऊणतास  काळ ठप्प झाली होती.  तसेच गेटच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

नांदगाव-चाळीसगांव दरम्यान पिंपरखेड ( नस्तनपूर ) येथील  रेल्वे गेट  जवळ रेल्वे इंजिनमध्ये दुपारी 12.30च्या दरम्यान तांत्रिक बिघाड   झाल्यामुळे गेटच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चाळीसगावहून ,नांदगाव , संभाजीनगरकडे या   मार्गाने मोठी वाहतूक होत असते या मार्गावर खूप रहदारी असते. सध्या कन्नड घाटाचे काम चालू असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहतूक ठप्प झाली होती.. रेल्वे गेटच्या  दोन्ही बाजूला वाहने अडकून पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच नांदगाव ला  कांदा घेऊन जाणारे ट्रॅक्टर, पिकअप, शालेय बस, विद्यार्थी, नागरिक अशा अनेक प्रवाशांचे हाल झाले. दुचाकीस्वार रेल्वेपुलाच्या खालून नदीपात्रातून तर काही लोक  जीव धोक्यात घालून पर्यायी मार्गाने वाहन काढून मार्गस्थ होत होते.  तब्बल पाऊण -एक तासाने गेट उघडल्याने त्यात पुन्हा काही बेशिस्त चालकांची वाहने घुसवल्याने खोळंबा झाला होता.

अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने   ‘डायमंड सामाजिक संस्थेच्या’ वतीने नेत्र तपासणी शिबिर….

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ‘डायमंड सामाजिक संस्थेच्या’ वतीने नेत्र तपासणी शिबिर….

मनमाड : आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डायमंड...

read more

मनमाड शहरात कर्तव्यदक्ष व निर्भिड पोलीस निरीक्षकाची नेमणुक करावी : रिपाईची मागणी !

मनमाड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात कायमस्वरुपी...

read more

रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल...

read more

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित!

कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]