मनमाड- शहरामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व पवित्र रमजान ईदनिमित्त चोख बंदोबस्त ठेवुन शांततेत व उत्साहात पार पडला. यात मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व त्यांच्या सर्व टीम ने उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेश गांगुर्डे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी समाजसेवक राजेंद्र भाबड, व्यापारी आघाडी मनमाड शहराध्यक्ष संजय मुनोत, लोक जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ सपकाळे,आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मेघा आहेर ने पटकावले सुवर्णपदक
दिल्ली येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय १९ वर्षा आतील मुलींच्या स्पर्धेत ४९ किलो वजनी...