loader image
[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

Apr 30, 2023

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती व तीन राष्ट्रीय युथ स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारी आकांक्षा किशोर व्यवहारे हिला महाराष्ट्र शासनाचा नाशिक जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू पुरस्काराने १ मे २०२३ रोजी पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचे हस्ते शासकीय कार्यक्रमात पोलिस परेड ग्राउंड नाशिक येथे गौरविण्यात येणार आहे.
स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख दहा हजार असे पुरस्काराचे स्वरूप असून मेक्सिको लिऑन येथे संपन्न झालेल्या युवा जागतिक आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्यपदक पटकावल्याने आकांक्षा ला जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडूचा थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा,प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर,सचिव दिनेश धारवाडकर,संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार
एस एस,गुरु गोविंद सिंग विद्यालयाचे अध्यक्ष बाबा रणजित सिंहजी,प्राचार्य सदाशिव सुतार,महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने,सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
.