loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात १५ दिवसाच्या डॉ.बाबसाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप

Apr 30, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या अर्थशास्त्र विभाग, आयक्यूएसी आणि जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसाची व्याख्यानमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 14 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान आयोजित केली होती. याचे उद्घाटन दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाले. आज दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी व्याख्यानमालेचे समारोप सत्र संपन्न झाले. या सत्रासाठी डॉ..चंद्रकांत कोकाटे उपस्थित होते . या प्रसंगी व्याख्यात्यानी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांची चलन विषयक भूमिका या बाबत आपले मत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर याच्या मार्गदर्शनाणे सुरु असलेल्या या व्याख्यानमाले साठी सत्र अध्यक्ष देविदास गोरे होते . आजच्या सत्रा प्रसंगी जनाबाजी सुमन बहुउदेषीय सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या सत्राला महाराष्ट्र तसेच देशभरातून अनेक प्राध्यापक विद्यार्थी नागरिक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती ज्योती बोडखे , पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे , प्रा.विठ्ठल फंड , कुलसचिव समाधान केदारे , आयक्यूएसी समन्वयक डॉ.मिलिंद अहिरे, अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र भोसले , जनाबाजी संस्थेच्या महिला विकास समिती अध्यक्ष सौ.त्रिवेणी गोरे, संचालिका विजया पाटील, तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हजर होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे यांनी सूत्रसंचालन, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन प्रा.कविता काखंडकी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.