loader image
[ays_poll id=7]

गॅस च्या भडक्यात जखमी झालेल्या मनमाड च्या केदारे कुटुंबियांच्या मदतीला धावल्या ना. भारती पवार

May 4, 2023

मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर केदारे यांच्या घरी गॅसचा भडका झाल्याने सागर केदारे त्यांच्या पत्नी आणि दोन मुले यामध्ये गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन तातडीने नाशिक येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी आज सादर केदारे यांच्या घरी घटनास्थळी भेट दिली व याबाबत नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना याबाबत तातडीने दखल घेऊन पुढील कारवाई करावी असे निर्देश डॉक्टर भारती पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले. या कुटुंबाला योग्य ती मदत आणि सहकार्य निश्चित केले जाईल असे डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले.याप्रसंगी त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण रौनदळ तसेच भाजप शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, एकनाथ बोडके,
अतु भामरे, अकबर शहा, गोविंद सानप आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू...

read more
.