Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – धुळे – मुंबई गाडीत प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

May 8, 2023

मनमाड,लासलगाव,निफाड आणि नाशिकच्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोरोना काळापासून प्रशासनाने बंद करून प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली होती. वेळोवेळी निवेदने देऊन अखेर रेल्वे प्रशासनाने पर्यायी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला होता मात्र आता तीच गाडी धुळ्याहून सोडत असून ह्या ३,४ दिवसातच मनमाड कर प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. धुळ्याहुन येणारी ही गाडी मनमाड पोहचेपर्यंत प्रवाशांनी तुडुंब भरलेली असते. मनमाडकर नागरिक जे रोज नाशिक येथे ये – जा करतात त्यांच्या समोर नाशिकला पोहचण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून रेल्वे प्रशासन जाणून बुजून प्रवाशांना त्रास देण्याच्या हेतूने हे सर्व करत असल्याचा सूर प्रवाशांकडून होत आहे. आज सकाळी धुळ्याहुण आलेल्या ह्या गाडीची परिस्थिती सोबत च्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता….अक्षरशः दरवाजात उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. गाडी सुटल्यावर शेवटच्या डबा पकडण्याच्या प्रयत्नात आज एका विद्यार्थिनीचा तोल जाऊन पडल्यामुळे किरकोळ जखमी झाली. आज नाशिक येथे सदर विद्यार्थिनीचा लेखी पेपर होता असे कळते.रेल्वे प्रशासनाने मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्वरित मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करून प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]