loader image
[ays_poll id=7]

हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

May 11, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील महिलांना भुताळीन ,डाकीन म्हणून हिणावुन त्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर अंधश्रध्दाविरोधी कायदा लागू करावा अनिसची मागणी 

 

हिरेनगर येथील जाधव कुटूबातील दोन महिलांना डाकिन, भुताळीन म्हणून हिणावुन त्यांना मारहाण करण्यात आली आहे भविष्यात त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून घटनेची चौकशी करुन दोषीवर अंधश्रध्दविरोधी कायदा कलम लागू करावे अशी मागणी नांदगांव अनिसच्या वतीने करण्यात आली आहे .

 पोलीसांनी दिलेली माहीती अशी की चहाबाई माझ्या अंगात आली या कारणावरुन जाधव कुटुंबात हानामारी झाली हि घटना हिरेनगर ता. नांदगांव येथे घडली हाणामारीत 

त्यात दोन महिला जखमी झाल्या असून या प्रकरणी जाधव कुटुंबातील चार व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आंगात येणे हि मानसिक विक्रुती असते असे असतांना देखील अंधश्रध्दाळू लोक अंगात येणे खरे आसते असे भासवुन अंगात येण्याच्या नावाखाली चहाबाई जाधव व अल्पवयीन मुलगी जयश्री यांना लाथा बुक्याने मारहान करुन जखमी केले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे याबाबत फिर्यादी चहाबाई जाधव यांनी फिर्यादीत म्हटलेकी संशयीत आरोपी शांताराम जाधव,विमलबाई जाधव,सुमनबाई जाधव, आन्ना जाधव यांनी तु सुमनबाईला लटकली म्हणजे अंगात आली या कारणावरुन फिर्यादी व त्यांची मुलगी यांना मारहाण केली होती.फिर्यादी व संशयीत आरोपी हे भाऊबंद आहेत.

दरम्यान या घटनेची तक्रार पीडित महिलेचे पती,व पिता काळू जाधव यांनी

महाराष्ट्र अंधश्रध्दा निमृलन समिती नांदगांव यांचे कडे करण्यात आली असून या घटनेची सखोल चौकशी करुन दोषीवर अंधश्रध्दाविरोधी कायद्याचे कलम लागू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे अनिसने पो नि रामेश्वर गांढे यांचे कडे केली आहे दोषीवर कारवाईची मागणी नांदगांव अनिसचे 

देविदास मोरे,मारुती जगधने, किरण भालेकर,राजेंद्र जाधव,प्रज्ञानंद जाधव,प्रदीप थोरात,भगिरथ जेजुरकर, प्रा सुरेश नारायने,दत्ताञय इपर,आदींसह नांदगांव अनिसच्या वतीने केली आहे .


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.