loader image

मनमाड लोहमार्ग पेालीसांकडुन दोन जबरी चोरीच्या गुन्हया सह एकुण 09 गुन्हे उघडकीस

May 17, 2023


रेल्वे पोलीस ठाणे मनमाड येथे दाखल गु.र.नं. 201/2023 कलम 392 भा.द.वि. प्रमाणे दाखल असुन यातील फिर्यादी महिला प्रवाषी या दि. 18/03/23 रोजी गाडी नं. 22151 डा. पुणे काझीपेठ एक्स. चे गार्ड शेजारील जनरल कोच मधुन रे.स्टे.कोपरगांव येथुन गाडी सुटल्या नंतर फिर्यादी यांचा एक काळया रंगाचा रेडमी 9 आय मोबाईल किं. 8000 रू. चा असा चोरटयाने खिडकीतुन हात टाकुन फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल घेवुन पळुन गेला त्या बाबत फिर्यादी यांनी रे.पो.ठाणे भुसावळ येथे तक्रार दिल्याने दि. 20.03.2023 रोजी नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड गुन्हा नोंद क्रमांक 201/23 कलम 392 भादवी मध्ये एका मोबाईलचे ट्रेसिंग प्राप्त झाले होते त्यावरून मूळ आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे अविनाश वाल्मीक घुले राहणार शिंगणापूर तालुका कोपरगाव जिल्हा नगर हा मिळून आल्याने त्यास दिनांक 22/04/2023 रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती त्याच्याकडे तपास करता त्यांनी आणखीन 06 मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे मोबाईल जप्त करण्यात आले असून तपास करत असताना इतर 08 गुन्हे उघड झाले असून त्यातील सोने व मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे
1) गुन्हा नोंद क्रमांक 201/23 कलम 392 भा.द.वि. मध्ये रेडमी कंपनीचा मोबाईल किं. 8,000 रुपये.

2) गुन्हा नोंद क्रमांक 202/23 कलम 379 भा.द.वि. मध्ये ओपो कंपनीचा मोबाईल किंमत 8,999 रुपये.

3) गुन्हा नोंद क्रमांक 760/22 कलम 379 भा.द.वि. मध्ये रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 14,999 रुपये.

4) गुन्हा नोंद क्रमांक 24/23 कलम 379 भा.द.वि. मध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 24,999 रुपये.

5) गु.र.नं. 141/23 कलम 379 भा.द.वि. विवो कं.चा मोबाईल व 2.5 ग्राम सोन्याची लगड एकूण 24,000 रुपये

6) गुन्हा नोंद क्रमांक 14/23 कलम 392 भा.द.वि. मध्ये 15 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 75,000 रुपये.

7) गुन्हा नोंद क्रमांक 57/23 कलम 379 भा.द.वि. मध्ये 07 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 50,000 रुपये.

8) गुन्हा नोंद क्रमांक 188/23 कलम 379 भा.द.वि. मध्ये 35 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 1,50,000 रुपये.

9) गुन्हा नोंद क्रमांक 151/23 कलम 379 भा.द.वि. मध्ये 09 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 36,000 रुपये.

गुन्हया व्यतिरीक्त मोबाईल:-
1) काळया रंगाचा रेडमी कं.चा मोबाईल माॅ.नं. 10 प्रो किं. 20,000 रू.

2) निळया रंगाचा सॅमसंग कं.चा मोबाईल किं. 17,000 रू.

सदर गुन्हयांमध्ये एकुण:- 4,28,997 रू. चा माल हस्तगत करण्यात आला असुन दोन जबरी चोरीच्या गुन्हया सह एकुण 09 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. गणेश शिंदे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री. दिपक काजवे साहेब यांचे मार्गदर्षनाखाली शरद जोंगदंड, पोलीस निरीक्षक, स.पो.नि. सोमनाथ वाघमोडे, ग्रे.पो.उपनि. सुरेश सोनवणे स.फौ. दिनेश पवार, हेमराज आंबेकर, पो.हवा. संजय निकम, पो.ना. महेंद्रसिंग पाटील, संतोश भालेराव, प्रकाश पावसे, किरण व्हंडे, अमोल खोडके, किशोर कांडीले, पो.शि राज बच्छाव यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.