loader image
[ays_poll id=7]

रस्त्यावरील गोर-गरिबांच्या दुकानांवर कारवाई केल्यास,वंचित बहुजन आघाडी छेडणार आंदोलन

May 19, 2023


मनमाड :-मनमाड नगर परिषदेतर्फे बुधवार दिनांक 17/05/2023 रोजी रस्त्यावर दुकाने, हातगाडी लावणाऱ्या गोर-गरिबांना अतिक्रमण निष्कासित बाबतची नोटीसी देण्यात आलेल्या असून सदर नोटीसीत अतिक्रमणे 3 दिवसात काढुन घ्यावे असे कळविले आहे.
परंतु रस्त्यावर असे छोटे मोठे, व्यवसाय करून आपले व आपल्या परिवाचे उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिबांवर अतिक्रमण कारवाई का,?
मनमाड शहरात मोठे मोठे इमारती ज्यांनी बांधकाम परवानगी पेक्षा अधिकचे बांधकाम केले आहे, असे पक्के बांधकाम अतिक्रमण नाही का? मनमाड नगर परिषद त्यांच्यावर पक्के अतिक्रमण निष्कासित कारवाई करणार का?

मनमाड शहरातील पाणी टंचाई मुळे परस्थिती अशी की दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्या ही दुष्काळात तेरावा महिना म्हणावे की मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरिबांवरच अतिक्रमण कारवाईच्या नोटीशी देण्यात आल्या आहेत.

मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरिबांवर अतिक्रमण कारवाई केली गेली तर त्यांचे उदरनिर्वाह उध्वस्त होऊन त्यांचे परिवारातील लोकांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणार आहे, या हुकूमशाही पद्धतीची कारवाई मुळे गोरगरिबांना आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही, तरी रस्त्यावरच्या कोणत्याही दुकानावर अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी मनमाड नगर परिषदेची राहील, असा ईशारा वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी तर्फे देण्यात आला, निवेदनावर, जिल्हा सचिव कादीर शेख, शहर उपाध्यक्ष गणेश एळींजे, शकील शेख, राकेश पगारे, जफर सैय्यद,पंकज आंबोळे, अमोल केरे, शकील शेख, पापा पठाण, दुकानदार बांधव, रफिक अत्तार, समीर अत्तार गणेश कासार, बादशाह अत्तार, सलीम अत्तार, भगित्रीबाई कासार, इम्तियाज अत्तार, अमजद अत्तार, जगदीश हादगे, अकील अत्तार, शमुना अत्तार, विलास देवरे, अल्ताफ अत्तार, शबाना अत्तार, ललित पाटणी, आदींचे निवेदनावर स्वाक्षरी आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.