loader image
[ays_poll id=7]

साई भक्तांना संस्थान ची विनंती – ३० सप्टेंबर नंतर २००० च्या नोटा दानपेटीत टाकू नका

May 21, 2023

30 सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका’, असे आवाहन साई संस्थानच्या वतीने साई भक्तांना केले आहे. 30 सप्टेंबर पर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारच्या नोटा स्वीकारल्या जातील. मागील नोटबंदीच्या काळातील 3 कोटी रुपयांच्या अजूनही नोटा पडून असल्याने साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर नंतर दोन हजारच्या नोटा न टाकण्याचे आवाहन साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी केले आहे.

देशभरातून दररोज हजारो भाविक साईंच्या दर्शनाला शिर्डीत हजेरी लावत असतात 10 रुपयांपासून लाखोंचे दान साईंच्या झोळीत अर्पण करतात. या आलेल्या दानाची मोजदाद आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी केली जाते. साईबाबा संस्थान दानाची मोजदाद केल्यावर कुठलीही रक्कम स्वतःकडे न ठेवता थेट बँकेत जमा करते त्यामुळे आता 2 हजार रुपयांच्या नोट संदर्भात झालेल्या निर्णयामुळे साईबाबा संस्थान कोणतीही अडचण नसून आलेल्या नोटा या थेट बँकेत जमा होतील. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा दानात येण्याच प्रमाण मागील काही महिन्यांपासून अत्यल्प असून मागील नोटबंदीनंतर हजार आणि पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात दानात उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता झालेल्या निर्णयानंतर दोन हजारांच्या नोटांचे दान आगामी काळात वाढणार का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
.