loader image
[ays_poll id=7]

शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

May 24, 2023


मनमाड शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मालेगाव नाका येथील कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती.

मनमाड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पटेल,पाणीपुरवठा विभागाचे काजवे व संबंधित अधिकारीसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
याप्रसंगी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. सद्यस्थितीत शहरात साजरे होत असलेले समारंभ व इतर अत्यावश्यक बाबींसाठी योग्य ती पावती घेऊन पाणी उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
पाण्याचे आवर्तन हे पूर्ण क्षमतेने व संपूर्णपणे मिळवण्यासाठी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्याना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाया जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी व्हॉल्वमन यांनाही ह्या बैठकीत सूचना करण्यात आल्या.

बैठकीस उपस्थित सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गास नागरिकांची गैरसोय होऊ नये व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून सूचना केल्यानंतर लवकरच मनमाड शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत होणार आहे.

 


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.