loader image
[ays_poll id=7]

मनमाडचा ऋषी शर्माची जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी – एकाच सामन्यात टिपले सात बळी

May 28, 2023

धुळे येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात मनमाडच्या रुषी शर्माने नंदुरबार जिल्हा संघासाठी दमदार कामगिरी करत पुणे संघाविरोधात झालेल्या सामन्यात सात बळी मिळवत चमकदार कामगिरी केली.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आमंत्रितांच्या ( जिल्हास्तरीय ) अंडर 16 स्पर्धेत
भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा या खेळाडुने नंदुरबार जिल्हा अंडर 16 संघामध्ये खेळत असताना पुण्यातील एम सी वी एस अंडर 16 संघासमोर जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले सर्वोत्कृष्ठ गोलंदाजीचे प्रदर्शन केले. धुळे येथील कुंडाने ग्राउंडवर हा सामना खेळवला गेला ज्यात नंदुरबार संघाला हार पत्करावी लागली. परंतु मनमाडच्या या किशोरवयीन खेळाडुची कामगीरी पुन्हा एकदा उत्तम अशी ठरली. गोलंदाजी करताना 12.5 षटकात 7 बळी रुषीने प्राप्त केले व त्यानंतर मनमाड मधील अध्ययन चव्हाण याने देखील या सामण्यात 1 बळी मिळवला. रुषीच्या या खेळीसाठी जिल्हासंघात त्याचे कौतुक करण्यात आले.

मनमाड शहरातुन सातत्याने रूषी शर्मा हा जिल्हा संघासाठी खेळत आहे. रुषी व अध्ययनच्या चांगल्या कामगीरिसाठी सर्वाकडुन जागोजागी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी रुषी व अध्ययन यांचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफान मोमीन , मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख , हबीब शेख , सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , कौशल शर्मा , सनी फसाटे , परेश राऊत
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्मा व अध्ययन चव्हाण यांचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.