मनमाड शहरात आज 28 मे 2023 रविवार रोजी श्री गजानन महाराज मंदिर शिवाजीनगर नंबर एक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व सावरकर प्रेमी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रमोद मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर स्वतंत्रतेचे स्तोत्र सामूहिक जयस्तुते गायन करण्यात आले. दैनिक तरुण भारतच्या वतीने आज स्वातंत्र्यवीर सावरकर विशेषांक प्रकाशित करण्यात आला त्याचे प्रकाशन या ठिकाणी प्रकाश गाडगीळ सर व नितीन पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचे वाचन चि.अथर्व लाळे यांनी केले. प्रमोद मुळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली भाषाशुद्धी याविषयी माहिती दिली. समीर कुलकर्णी यांनी, आज भारताला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्वलंत विचारांची व जातीपातीच्या भिंती तोडून सर्व हिंदूंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.त्याचप्रमाणे अखंड भारत हे सावरकरांचे स्वप्न आहे हे सत्यात उतरण्यासाठी सावरकर घराघरांमध्ये व मनामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले. सूत्रसंचालन समीर कुलकर्णी व उमेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी अनंता भामरे, प्रकाश कुलकर्णी, हेमंत पेंडसे,पियुष गंगिले, प्रदीप अंजाळेकर,भुसारी काका, द्वारकानाथ झांबरे सर, प्रसाद दिंडोरकर, युवराज बळेल व वेदिका महिला मंडळ तसेच सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गायनाने करण्यात आली.
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...











