loader image
[ays_poll id=7]

पर राज्यातील मनोरुग्ण आई ने केली पाच महिन्याच्या चिमुकलीला मारहाण – समाजसेवक पिंटू मामा कटारे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले मुलीचे प्राण

May 29, 2023


एकीकडे सरकार आणि प्रशासनिक पातळीवर बेटी बचाव बेटी पढाव चा कार्यक्रम सगळीकडे आयोजित करत असतानाच मनमाड शहरात मात्र अवघ्या पाच महिन्याच्या मुलीला आईनेच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.शहरातील मनमाड – येवला रोडवरील कॅम्प मध्ये पाच महिन्याच्या मुलीला अंगावर गंभीर जखमा झाल्या असून समाजसेवक विलास कटारे यांना ही घटना कळताच त्यांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर बेदाम मारहाण करणाऱ्या आईला मनमाड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क करत तिला घेऊन जाण्यास सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कॅम्प भागात रस्त्याच्या कडेला एक महिला तिच्या जवळ असलेल्या पाच महिन्याच्या लहान मुलाला बेदम मारहाण करत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी तातडीने समाजसेवक विलास कटारे यांना कळविले असता त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन महिलेची चौकशी केली. मात्र सदर महिला दक्षिण भारतीय असल्यामुळे तिची भाषा समजत नव्हती. तर मारहाण केल्यामुळे मुलगी जोरजोरात रडत होती. मात्र तिच्या बोलण्यावरून ही मुलगी याच महिलेची आहे की पळवून आणली आहे. याचा उलगडा होत नसल्याने कटारे यांनी त्या मुलीला तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मुलीवर प्राथमिक उपचार केले असून तिच्या अंगावर गंभीर जखमा असल्यामुळे तिला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सदर महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र तिच्याशी संपर्क केला असता तिची भाषा कळून येत नाही. त्यामुळे महिला बोलत असलेल्या भाषिकाला बोलावले असता सदर महिला उडवा उडविची उत्तरे देत असल्याचे त्याने सांगितले. सदर प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन मुलीच्या तब्बेतीची डॉक्टरांकडे विचारपूस केली. तर सदर महिलेबाबत तिच्या कुटुंबीयांकडे अधिक विचारपूस केली असता तिचे नाव लक्ष्मी मलय्या गंगव्वा ( रा. माहुरी, जिल्हा निजमाबाद, तेलंगणा) आहे. ती काही प्रमाणात मनोरुग्ण स्वरूपाची असून नवऱ्याने सोडून दिल्यामुळे ती आपल्या आईवडिलांकडे राहत असते. मनोरुग्ण असल्यामुळे ती घरातून निघून जात असते. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तिच्या कुटुंबीयांना येऊन तिला घेऊन जाण्याचे सांगितले आहे. समाजसेवक विलास कटारे यांच्या सतर्कतेमुळे आज एका पाच महिन्याच्या मुलीचे प्राण वाचले असल्याने समाजसेवक कटारे आणि पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.