loader image
[ays_poll id=7]

मासिक पाळी समज व गैरसमज या विषयावर मनमाड येथे करण्यात आली जनजागृती

Jun 2, 2023

दि.२/६/२०२३ रोजी मनमाड येथे श्रावस्ती नगर येथील बौध्दविहार या ठिकाणी राजाश्रय फाउंडेशन व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बालविकास प्रकल्प अधिकारी मा.श्री.अजय फडोळ सर व मा.श्री.वाकडे सर(प्रभारी अधिकारी) व सर्व मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत फुलगुच्छ देवुन करण्यात आले ..मासिक पाळी समज व गैरसमज या विषयांवर उपस्थित महिलांना अतिशय सुरेख असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले तसेच उपस्थित अंगणवाडी ताई ,विभागातील महिलांना हसत खेळत प्रश्नमंजुषा द्वारे डॉ. दिपक खाडे सर ह्यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छतेचं महत्व व मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी ,आहार,आरोग्य विषयी माहिती दिली.. मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम यांनी ही मासिक पाळी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. खरं सागांयचे तर आपले आरोग हिच खरी संपत्ती आहे आणि आपल्या निरोगी आरोग्या साठी आपली काळजी घेतली पाहिजे.. उपस्थित महिलांना राजाश्रय फाउंडेशन मार्फत मोफत सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास राजश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ ज्ञान राजे, निलेश सर ,राजश्री देशमुख शिवराजे ज्योती ताई
प्रकाश देशमुख तसेच बालविकास प्रकल्प नागरी नाशिक अंतर्गत मनमाड येथील सर्व सेविका मदतनीस ताई व विभागातील महिला व किशोर वयीन मुली उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेविकाताई आणि मदतनीस ताई यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्नपूर्णा अडसुळे ताई यांनी केले. शितल गायकवाड मँडम यांनी मान्यवरांचे प्रकल्पाच्या वतीने आभार मानले कांचन भारंबे ताई,कल्पना बनकर ताई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.