15 ऑगस्ट 2024 , मनमाड शहरात पहिल्यांदाच 14 वर्षातील क्रिकेट खेळाडुंसाठी लेदर बाॅल T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त या स्पर्धेचे उद्घाटन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत मनमाड , मालेगाव , पाचोरा , नांदगाव, नाशिक येथील 14 वर्षाआतील सहा संघाने सहभाग नोंदवला. हि स्पर्धा साखळी पध्दतीने खेळवली जाणार असुन 15 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवार फक्त या दोन दिवसात श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंडवर हे सामने खेळवले जाणार आहे.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्री. सुनिल हांडगे यांच्यातर्फे 5001 रू. व श्री. आमिन पटेल यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 3001 रु. देण्यात येणार आहे. इतर पारितोषिक श्री. तैय्यबभाई शेख यांच्यातर्फे देण्यात आली. श्री. श्रेणिक बरडिया ( सीऐ ) व अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफानभाई मोमीन यांचे विशेष सहकार्य लाभले.
या स्पर्धेचे उद्घाटन मनमाड गुरुद्वारा चे जत्तेदार बाबा रणजीत सिंह जी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उद्घाटन प्रसंगी मनमाड नगरपालिकेचे सिओ. शेषराव चौधरि सर , सुखदेव सिंग सर ( प्रशासक एस.जी.जी.एस. ) आमिन पटेल ( नगरसेवक ) , अमजद पठान ( नगरसेवक ) , तय्यबभाई शेख , सनी अरोरा , जावेद शेख , मनोज ठोंबरे , बशीरभाई हे मान्यवर लाभले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी रोहित पवार, दक्ष पाटिल, चिराग निफाडकर, अध्ययन चव्हाण, मयुरेश परदेशी , शिवराज चव्हाण , सम्यक आहिरे , साहील मोरे , कृष्णा बहोत व भुमी क्रिकेट अकॅडमीतील अंडर 14 संघाने विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचे आयोजन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल व भुमी क्रिकेट अकॅडमीचे संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्यातर्फे करण्यात आले.