loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथे ३५० वा हिंदू साम्राज्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा….

Jun 3, 2023


मनमाड : येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक दिन जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेच्या वतीने आय यू डी पी भवानीचौक मनमाड येथे मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.

जनजाती कल्याण आश्रमाचे मालेगांव जिल्हा सहसचिव श्री.गणेश व्यवहारे यांनी श्री.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली , शहर अध्यक्ष प्रकाशनाना कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करतांना या सुवर्णक्षणाचे महत्व विशद केले. विवेक हातेकर (जनजाती कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते )आणि प्रमोद मुळे( रा स्व संघ जिल्हा कार्यकर्ता ) यांनी श्री.शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हुबेहूब वर्णन करून साक्षात सोहळ्यात सहभागी होण्याची अनुभूती श्रोत्यांमध्ये निर्माण केली. जनजाती कल्याण आश्रमाचे शाखा कोषाध्यक्ष डी.टी.पवार सरांनी सदर कार्यक्रमाचे महत्व आणि त्याचे फलित हिंदू स्वाभिमान व भविष्या साठीची गरज लक्षा़ंत आणून देणेचा प्रयत्न केला. शाखा सचिव शशिकांत भागवत यांनी सर्व ऊपस्थितांचे आभार मानले.हेमंत पेंडसे,आनंद काकडे,योगेश म्हस्के, अथर्व लाळे रश्मिकांत आहेर,सोहम कुलकर्णी व शिवप्रेमी नागरिक बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

मनमाड : इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के. हायस्कूल अँड...

read more
मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड - आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच...

read more
.