loader image
[ays_poll id=7]

मांडवड / गिरणानगर ग्रामविस्तार अधिकारी संतोष जाधव निलंबीत

Jun 8, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील मांडवड व  गिरणा नगरचे ग्रामविकास अधिकारी संतोष  जाधव यांनी कर्तव्यात कसूर करुन गैरव्यवहार केला म्हणून त्यांचे निलंबन केल्याने पंचायत समिती व ग्रामपंचायत गोटात एकच खळबळ उडाली आहे .

नांदगांव तालुक्यातील मांडवड व गिरणा नगर येथील ग्रांमपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संतोष मिठाराम जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेला होता. या अहवालानुसार जाधव यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यानुसार जाधव यांचे निलंबन करण्यात आल्याचे पत्र  मुख्यकार्यकारी अधिकारी नाशिक यांनी काढले असून तसे आदेश नांदगांव गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जाधव यांनी कर्तव्यात असताना मांडवड येथील ग्रांमपंचायतीचे दप्तर तपासणीला उपलब्ध करुन न देणे,लेखा परीक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करुन न देणे,मांडवड आणि गिरणानगर येथे कामावर गैहजर राहणे, गिरणानगर ग्रामनिधी रु २,७८,८५२ आणि पाणी पुरवठा निधी रु ८८,३२२ असा एकुण रु ३,६७,१७४ चा तसेच १५ व्या वित्त आयोगा मध्ये रक्कम रु १,९१,८९८ चा अपहार करणे, प्रियाशाॅफ्ट मध्ये ई-ग्राम शाॅप्ट मध्ये माहिती न भरने , नमुना नं १ ते ३३ न ठेवने ,पंचायत समितीच्या मासिक सभेला हजर न राहणे, ग्रांमपंचायत मध्ये रक्कम रुपये १२,०६,५७२ संशयीत आणि रक्कम रु २७,९७५. कायमस्वरूपी अपहार करणे, कामात कसुर करुन हलगर्जीपणा करणे, कामकाजाचा अहवाल सादर न करणे, रक्कम नसतांना पंचायतसमितीला चेक देऊन कार्यालयाची फसवणुक करणे, मांडवड ग्रामचायतीचा रुपये २,३०,५६८ संशयीत अपहाराबाबद ,ग्रामविकास अधिकार्याने कर्तव्यात कसूर केली आहे. आदी दोषारोप असलेला अहवाल नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेला होता. त्या आधारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हापरीषद सेवा/ वर्तणुक नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केला आहे. महाराष्ट्र जिल्हापरीषद. जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३(१)अ प्रमाणे जाधव यांना निलंबित केले असल्याचे आदेश काढले आहेत. या घटनेने तालुक्यातील काही ग्रामसेवकांचे कामाचे पित्तळ उघडे पडले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.