loader image
[ays_poll id=7]

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

Jun 14, 2023

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे भूमीपुत्र प्रा.नितीन लालसरे यांचा वाढदिवस मनमाड शहरात आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. प्रा.नितीन लालसरे हे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासु आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन सर्वत्र परिचित असून त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात आपला मित्र परिवार हा राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्माण केला आहे. श्री नितीनजींच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक शहरांमध्ये रक्तदान शिबिर , हेल्थ चेकअप कॅम्प , फळे वाटप सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनमाड शहरात देखील श्री नीतीन भाऊ लालसरे मित्र परिवाराच्या वतीने मनमाड शहर पोलीस स्टेशन आणि मनमाड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी यांना रेनकोट भेट म्हणुन देण्यात आले तसेच सायंकाळी अश्विनी नगर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रमुखअतिथी म्हणुन प्रसिध्द गोल्डमॅन श्री सनीनाना वाघचौरे आणि श्री बंटीदादा गुजर हे उपस्थित होते. या कार्यक्रमास मनमाड सह मुंबई , पुणे , नागपुर , सोलापूर , छत्रपती संभाजी नगर , जालना , अहमदनगर , धुळे , नाशिक, झाशी या विविध शहरांसह राज्यातील अनेक गावांतील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रातील मान्यवर मंडळी , पत्रकार बांधव , मित्र परिवार आणि नातेवाईक उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास अमेरिका येथून देखील काही मान्यवर श्री नितीनजींना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री नितिनभाऊ लालसरे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.