मनमाड शहरातील श्री दत्त पुलाचे लोकार्पण आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या घरात पाणी गेले होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे तसेच शिवसैनिक पदाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर दिला होता. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ या पुलासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून नवीन पूल बांधण्याचे वचन दिले होते.
श्री दत्त पूल नव्याने बांधून पूर्ण झाला आणि काल या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड करांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले, मनमाड शहराच्या विकासाकरता कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी मनमाड नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच नवीन इमारत बनवून तयार होणार आहे असे त्यांनी सांगितले, तरुण पिढीसाठी आदर्श घ्यावा आणि म्हणून आपल्या महापुरुषांचे पुतळे आपल्या शहरात असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच नागरिकांच्या भावना समजून विविध महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे व नवीन स्मारकाचे बांधकाम वेगात सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, मनमाड शहरातील क्रीडांगणासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून कामास सुरुवात झाली आहे आणि यात भर म्हणून अजून चार कोटी रुपये लवकरच मंजूर होतील असे एकूण नऊ कोटी रुपयांमध्ये सुसज्ज आणि सुविधा युक्त क्रीडांगण आपल्या मनमाड शहरातील तरुणांसाठी तयार होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी मा.नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे,राजाभाऊ पगारे, बबी कवडे, युवासेना जिल्हाप्रमुख फरान(दादा)खान, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, राजाभाऊ भाबड, अल्ताफ बाबा खान, बबलू पाटील, भाजपचे नितीन पांडे,जय फुलवाणी, नारायण पवार, बुडन शेख, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, संजय निकम, महेंद्र शिरसाठ, दऊ तेजवानी, किशोर लहाने, डॉ सांगळे, अंकुश कातकडे, महावीर ललवानी,आमीन पटेल,राकेश ललवाणी, शिवसेना,युवासेना, शिवसेना महिला आघाडी,बीजेपी, आरपीआय, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.