loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

Jun 17, 2023

मनमाड – येथील कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज’ या नावाने ११ वी १२ वी चे ज्युनियर कॉलेज सुरू झाले असून मनमाड शहरात सर्व शाखा इंग्रजी माध्यमात असणारे पहिलेच कॉलेज ठरले आहे.

ज्युनियर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेसाठी शासन परिपत्रकाप्रमाणे प्रवेशप्रक्रिया दि. १४ जून २०२३ पासून सुरू झालेली असून दहावी उत्तीर्ण विदयार्थ्यांनी ११ वी प्रवेशनोंदणीसाठी के. आर. टी. हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती दर्शविल्याने प्रवेशासाठी विदयार्थ्यांची झुंबड उडाली आहे.

११ वी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी आमची सर्व तयारी झाली असून विदयार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी योग्य शैक्षणिक अर्हता व अनुभवसंपन्न शिक्षकवृंदासोबतच डिजिटल क्लासरूमचा प्रभावी वापर याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आवश्यकतेप्रमाणे द्विभाषेची सोय सुध्दा उपलब्ध करून सुलभ पध्दतीने इंग्रजीतून शिक्षणाची व्यवस्था दिली जाणार असल्याचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी स्पष्ट केले आहे. इ. १० वी च्या १०० टक्के निकालाची परंपरा असणा-या या शाळेत कला व वाणिज्य शाखेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आयटी विषय निवडण्याची संधी उपलब्ध असून आयटी विषयासाठी स्वतंत्र संगणककक्ष व व्यवस्थेसोबतच मोफत ग्रंथालय व स्वतंत्र स्टडीरूमची व्यवस्था देखील आहे.

कला व वाणिज्य शाखेत देखील उत्तम करियर संधी उपलब्ध असल्याने त्या शाखेत प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांना इंग्लिश स्पिकींगसाठी मिसर सरांचे फिनिक्स स्पोकन क्लासेस मोफत दिले जाणार आहे.

प्रवेश शासनाच्या परिपत्रकातील नियम व गुणवत्ता यादीप्रमाणे होणार असून प्रवेशासाठी कार्यालयात किंवा कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या प्रवेशप्रमुखांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.