loader image
[ays_poll id=7]

बाणगाव खुर्द येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न

Jun 20, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
आ.सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज बाणगाव खुर्द येथे जातेगाव गटातील मांडवड गणातील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी आ. सुहास कांदे सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाची दखल राज्य सरकार ने घेऊन राज्यात शासन आपल्या दरबारी ही मोहीम सुरू केली, सर्व सामान्यांना त्यांच्या गावात येऊन विविध सुविधा पुरविण्याची ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले. उपस्थित नागरिकांनी जास्तीत जास्त या अभियानाचा फायदा घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
राधाकृष्ण लॉन्स बाणगाव खुर्द येथे आज मोठ्या संख्येने मांडवड गणातील प्रत्येक गावातून आलेल्या नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून विविध सुविधांचा लाभ घेतला.
ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच विविध शासकीय दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात आणि म्हणूनच या शिबिराच्या माध्यमातून त्यांना तात्काळ विविध दाखले व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य होत असल्याचे दिसून येत आहे.
रेशन कार्ड संबंधित विविध त्रुटी अडचणी तसेच विविध निराधार योजना विधवा पेन्शन योजना व इतर शासकीय दाखल्यांसाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली.

आरोग्य सुविधा महावितरण तहसील पंचायत समिती डोळे चेकप असे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते.
राज्य कृषी अभियांत्रिकी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना या वेळी ट्रॅक्टर देण्यात आले. यावेळी आरोग्य विभागामार्फत ४५६ जणांची तपासणी करण्यात आली. तर ७२५ व्यक्तीची नेत्र तपासणी करूण ६७४ व्यक्तीना चषमे वाटप करण्यात आले तर ३० व्यक्तीचे डोळयाचे ऑपरेशन करण्यात आले . १०५ जणांना विविध शासकीय दाखल्याचे वाटप झाले २२८ जणांना रेशनकार्ड चे वाटप करण्यात आले .
यावेळी कासारी ‘ पोही ‘ माणिकपुंज ‘ कसाबखेडा ‘ बाणगाव खुर्द ‘ बाणगाव बुर्दक ‘ खिर्डी ‘ वडाळी ‘ सोयगाव ‘ मोरझर ‘ दहेगाव ‘ तांदुळवाडी ‘ मांडवड ‘ लझ्मीनगर या गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, प्रमोद भाबड, बाजार समिती मा.सभापती तेज कवडे, संचालक एकनाथ सदगिर, विक्रम फोडसे, बाळासाहेब पवार, नंदू खरात, समाधान पाटील, कैलास चोळके, बबलू पाटील, योगेश इमले, बाबा भिलोरे, कैलास गायकवाड, सागर हिरे, विलास गायकवाड, भाऊसाहेब सदगीर, शिवाजी वडगळ, दत्तू काळे, शांताराम कवडे, प्रभाकर कवडे, समाधान हिरे, वाल्मीक गोराडे आदी उपस्थित होते
शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी ,शिवसैनिक, विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन उप चेरमन सर्व सदस्य व इतर लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.