मनमाड:- मनमाड मधील गुड शेफर्ड स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग आणि प्राणायमाने शारीरिक तंदुरुस्ती तर राहतेच पण मनाला देखील शांती मिळते. गुड शेफर्ड स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व माणसिक आरोग्याविषयी दररोज काळजी घेतली जाते. आज योग दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर केले. शाळेतील उत्कृष्ट योगाचे सादरीकरण करणारे खेळाडु कु. अवनी लोखंडे, कु. शुभ्रा गुजराथी, कु. प्रतिष्ठा व्यवहारे, व कृष्णा व्यवहारे यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर करून दाखवले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
शाळेचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांनी योगाचे महत्व सांगितले. श्री. व्यंकटेश देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
बघा व्हिडिओ-मनमाड शहरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा
मनमाड : योगेश म्हस्के मनमाड शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा...










