loader image
[ays_poll id=7]

कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा…

Jun 21, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी नांदगाव येथील प्रसिद्ध योग शिक्षिका डॉ.जागृती पवार व डॉ.किर्ती आहेर यांनी विद्यार्थ्यी व शिक्षकांना योग व प्राणायामाचे धडे दिले. अनेक उपयुक्त व दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक योग व प्राणायामाचे प्रकार त्यांनी सांगितले व तसे प्रात्यक्षिक करून घेतले. यातून विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळाली. या पुढे नियमित योग करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी दोन्ही योग प्रशिक्षक मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रेरणा मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांची होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री. बोरसे सर, श्री. कांदळकर सर, श्रीमती शिंदे मॅडम, श्री. पठाडे सर, श्री. सोनवणे सर, श्री. जाधव सर, श्री. संदीप मवाळ, श्री. आबासाहेब सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.