loader image
[ays_poll id=7]

छत्रे विद्यालयात विश्व योगदिन साजरा

Jun 21, 2023


छत्रे विद्यालयाने विश्व योग दिन येथील महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर साजरा केला. याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक श्री प्रवीण व्यवहारे सर यांनी योगाच्या प्रत्येक आसनाची माहिती देत विद्यार्थ्यांकडून व उपस्थित सर्वांकडून सर्व योग प्रकार करून घेतले. राष्ट्रीय खेळाडू कु.दिया किशोर व्यवहारे व कृष्णा संजय व्यवहारे यांनी योगासणाची बहारदार प्रात्यक्षिक करीत सर्वांची वाहवा मिळविली. शाळेचे शिक्षक श्री धनंजय भामरे सर यांनी प्राणायामाचे महत्त्व सांगत प्रत्यक्ष प्राणायाम प्रकार करून दाखवले त्यानुसार विद्यार्थी व शिक्षकांनी आनंदाने सर्व योग प्रकार केले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पंकज खताळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एनर्जी ड्रिंक चे वाटप केले तसेच सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या संस्थेचे संचालक नाना कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक आर्.एन. थोरात यांनी मार्गदर्शन करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सचिव दिनेश धारवाडकर, संचालक प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर.एन.थोरात,उप मुख्याध्यापक संदीप देशपांडे,ज्येष्ठ पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे, पर्यवेक्षिका सौ.पोतदार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
.