loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा….

Jun 22, 2023


मनमाड : आज आंतरराष्ट्रीय योग दिन. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे.

आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे. योग एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्यदेखील प्रदान करतो.शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.

संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.

योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले गेले आहे. आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी भारतीय लोक योग महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे , योग हा भारतीय ज्ञानाचा पाच हजार वर्षांचा जुना वारसा आहे. महर्षि पतंजली हे योगाचे प्रणेते असल्याचे मानले जाते. योग साधनेत जीवनांचं संपूर्ण सार समाविष्ट आहे.

२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पुढाकाराने जगातील जवळपास सर्वच देशांनी निरोगी राहण्यासाठी योगाचा प्रसार करण्यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता , २१ जूनच्या दिवसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. म्हणून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनमाड शहरामध्ये विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला , छत्रे हायस्कुल , केंद्रीय इंजिनिअरिंग रेल्वे कारखाना , आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार , मनमाड महाविद्यालय शहरातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा आदी ठिकाणी विद्यार्थी , शिक्षक , कर्मचारी आणि नागरिकांनी विविध प्रकारचे योगासने करून आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.