loader image
[ays_poll id=7]

जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेची शबरीमाला वसतीगृहाला भेट

Jun 25, 2023


जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या कार्यकर्त्यांनी कनाशी येथील शबरीमाता वसतिगृहाला भेट देऊन तेथे आलेल्या नविन मुलींचे स्वागत केले. दरवर्षी प्रमाणे जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कनाशी सहलीचे आता जनतेतून देखील कौतुक केले जात असून या वर्षी देखील मोठ्या संख्येने समाजातील मान्यवर या सहलीत सहभागी झाले होते. दुर्गम भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी जे प्रयत्न जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने केले जातात त्यापैकी कनाशी येथे वसतिगृह हा एक प्रकल्प गेली अनेक वर्षे कार्यरत आहे व मनमाडच्या दानशूर मान्यवरांच्या माध्यमातून कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते तेथे सतत आवश्यक वस्तूंची ,निधीची तरतूद करत असतात यातूनच नवनविन कल्पना राबऊन वनवासी समाज बांधवांना आपले पणाने जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो.अतिशय दुर्गम भागातून आलेल्या या मुलींना सांभाळण्यासाठी व्यवस्थापिका देखील वनवासी समाजातील असल्याने चांगला सुसंवाद साधला जातो आणि मुली अभ्यासात देखील उत्तम प्रगती करतात हा अनुभव आहे,म्हणून दरवर्षी जून महिन्यात आलेल्या सर्व मुलींचे शालेय उपयोगाच्या वस्तू देऊन स्वागत करण्यात येते या निमित्ताने आयोजित सहली मध्ये सहभागी झालेले विविध मान्यवर देखील आपापल्या परीने देणगी देण्याचा प्रयत्न करतात.यंदाच्या या उपक्रमात सहभागी झालेले श्री नितिन देशपांडे,केशव गोडबोले,घोरपडे सर,श्रीमती उफाडे,विक्रम सप्रे ,रमाकांत मंत्री कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते शशिकांत भागवत,प्रकाश कुलकर्णी,प्रकाश गाडगीळ,हेमंत पेंडसे,संदीप सिनकर इत्यादी कार्यकर्त्यांनी मंगेश वाणी,सुभाष माकुणे,अनंता कुलकर्णी,बन्सल परिवार, स्व राम वैशंपायन ,स्वप्नील कुलकर्णी ( उमराणे) गुरुजित सिंह कांत श्रीधर सांगळे व ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ कीर्तने परिवार यांच्या कडून व यांच्या शिवाय अनेक मान्यवरांनी धान्य,कपडे, तेल डबा, शालोपयोगी साहित्य ,शिलाई मशिन व अन्य उपयोगी वस्तूंची देणगी तेथे सुपूर्द केली आहे या प्रसंगी तेथे उपस्थित असलेले जनजाती कल्याण आश्रमाचे विभाग स्तरावरील कार्यकर्ते नानाजी देवरे यांनी सर्व मनमाड करांचे स्वागत करून वसतीगृहाच्या दैनंदिन कार्याची ,मुलींच्या दैनंदिनीचा व अन्य व्यवस्थांची माहिती देऊन आज ही या सर्व व्यवस्था कशा आवश्यक आहेत हे सांगताना दुर्गम भागातील समाजावर येणारी विविध प्रकारची संकटे प्रामुख्याने गरिबी व त्यामुळे होणारे धर्मांतर यावर प्रकाश टाकला,मनमाड चे तरुण कार्यकर्ते योगेश म्हस्के यांनी मनोगत व्यक्त करतांना आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे भावनात्मक आश्वासन दिले, प्रकाश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात मनमाड हून कार्यकर्ते ज्या पद्धतीने कार्य करीत असतात त्याची माहिती सांगून सतत वाढते संकलन ही समाजाने हे कार्य स्वीकारल्याचे द्योतक असल्याचे नमूद केले आणि त्यांनी वसतिगृहातील दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलींचा कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्तने यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व उपयोगी साहित्य देऊन त्यांचा सन्मान करवून घेतला, व्यवस्थापिका गावित ताईंनी आभार मानले निलेश पवार यांनी सूत्र संचालन केले,वसंत महाले यांनी सर्व पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवत आश्रम कुठेही कमी पडत नाही असेच जणू दाखवून दिले वसतिगृहातील मुलींनी स्वागत गीत गात सर्व पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले, कनाशी कडे जाताना देवघरे परिवार आणि मनमाड कडे येताना दीपक वेढणे परिवार यांनी कळवण येथे देखील सुंदर स्वागत केल्याने ही एक अत्यंत प्रभावी अशी सहल झाली ज्यात श्री व सौ भागवत ,श्री व सौ मंत्री ,कीर्तने यांचा पूर्ण परिवार,अनिल दादा काकडे ,विवेक हातेकर,विनायक गांगुर्डे, सौ देवघरे, श्रीमती गवळी व अन्य मान्यवर सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.