loader image
[ays_poll id=7]

अनाथ पण कष्ट करूण पोट भरणाऱ्या अशोक यास आषाढी एकादशी च्या निमीत्ताने नवीन ड्रेस

Jun 29, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात वर्षानुवर्ष काम करूण पोट भरणारा स्वाभिमानी अशोक वाणी यास आषाढी एकादशी निमीत्ताने सामाजीक कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी समाधान नंदकुमार खैरणार व सुनील श्रीधर काळे यांच्याकडून नवीन ड्रेस ची भेट
अशोक वाणी हा गेल्या कित्येक वर्षा पासून रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर रहात असून प्रवाशी वर्गाचे ओझे वाहून आपले पोट भरतो . कुणाकडूनही भिक न मागता चालता येत नसतानांही प्रवाशांचे ओझे वाहून जे देतील ते पैसे घेवून आपली उपजीवीका करत असतो. तो स्टेशन परिसरात ज्या ही वेळेस काही खातो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला कावळे गोळा होतात . व तो सुद्वा त्या कावळयानां आपले अन्न देत असतो .
अशा या स्वाभिमानी अशोक ने बऱ्याच दिवसापासून अंगावरील कपडे बदलले नव्हते त्याला आज आषाढी एकादशी च्या निमीत्ताने येथील सामाजीक कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी समाधान खैरणार व सुनील काळे यांनी नवीन ड्रेस आणून त्यास घातला . त्यावेळेस अशोक च्या चेहऱ्यावर जे हास्य फुलले ते पाहून साक्षात श्री पांडूरंग चे दर्शन झाले असे समाधान खैरणार व सुनील काळे यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण –  शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण – शर्थीचे प्रयत्न ठरले यशस्वी

वेळीच रुग्णाचे लक्षणं बघून क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपचार सुरु केल्याने रुग्णाचे प्राण...

read more
नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर – आमदार कांदे यांनी केली पाहणी

नांदगाव शहरात साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या...

read more
माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ)...

read more
.