मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे नैराश्य निर्माण होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचावे. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल केली तर आपल्या अंगी आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण होऊन नैराश्य कमी होईल असे प्रतिपादन डॉ निकम यांनी केले. महाविद्यालयातील निकिता आहेर, नूतन देवरे, अनुष्का देवरे, गायत्री जाधव, प्रसाद पगार या विद्यार्थ्यांनी महाराजांविषयीचे आपले विचार भाषण व पोवाडा या माध्यमातून व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी एस देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. आर फंड, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पवन परदेशी यांनी केले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...