loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरामध्ये आषाढी एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी ….

Jun 29, 2023

मनमाड : आषाढी-कार्तिकी वारी निमित्त चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांचा मेळा भरत असतो , दरवर्षी पंढरीची वारी ही समस्त वारकऱ्यांसाठी एक मोठी पर्वणी असते , वारी म्हणजे शुद्ध भक्तीभाव , वारी म्हणजे एकात्मतेचे दर्शन आणि सर्व समाजाला एकरूप करणारी म्हणजे पंढरीची वारी होय.

आषाढी निमित्त पंढरीमध्ये लाखो वारकऱ्यांचा मेळा भरत असतो , मनमाड शहरामध्ये देखील दरवर्षी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा सोहळा अनेक विठ्ठल मंदिरांमध्ये साजरा करण्यात येत असतो , यंदाच्या वर्षी देखील आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.

शहरातील पुरातन असलेल्या श्री बालाजी विठ्ठल मंदिर , वेशीतील श्री विठ्ठल मंदिर , दत्त मंदिर येथील श्री संत सावता माळी मंदिर , बुधलवाडी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे पहाटे श्री विठ्ठल-रखुमाई मुर्तीला अभिषेक पुजन , दुपारी भजन , सायंकाळी नगरप्रदक्षिणा , हरिपाठ , महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आषाढी एकादशी निमित्ताने या मंदिरांमध्ये करण्यात आले होते. श्री विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली असुन , या सर्व कार्यक्रमांना शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.