loader image
[ays_poll id=7]

कत्तलीसाठी आणलेली जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत केला गुन्हा दाखल

Jun 30, 2023

बकरी ईद सणानिमित्त कत्तलीसाठी गोवंश जनावरांची चोरटी वाहतूक करतांना आणि शहरातील खदानी जवळ कत्तलीसाठी बांधून ठेवलेली अशा दोन्ही ठिकाणी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या ५ गायी, ६ बैल आणि ३४ गो-हे असे एकूण ४५ गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांसह अज्ञाताविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत अकरा लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील पांझन नदीच्या किनारी एफसीआय जवळ असलेल्या खदान शेजारी आज सकाळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने कत्तलीसाठी ५ गायी व ३४ गो-हे असे ३९ गोवंश जनावरे आणुन त्यांना त्रास होईल अशा प्रकारे दोरखंडांनी निर्दयतेने बांधुन ठेवले होते. सदर ठिकाणी छापा टाकून सदर जनावरे ताब्यात घेण्यात आली. सुमारे ६ लाख रुपयांच्या जनावरांची सुटका पोलिसांनी केली आहे. याबाबत अज्ञाता विरुद्ध पोलिस कर्मचारी समाधान देशमुख (वय ३१ वर्षे) यांनी गुन्हा दाखल केला आहे. तर शहरातील मालेगाव नाका येथे नाकाबंदी केली असता प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवंश असलेली जनावरे कत्तली साठी रस्त्याने नेली जाणार होती. त्यानुसार येवला – मालेगाव रस्त्याने एक महींद्रा बोलेरो पिकअप नंबर एम. एच. ४८ ए. जी. ५०६७ ही गाडी येवला बाजूकडून मालेगावकडे गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी घेवून जात असताना गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीची ६ बैल पिकअप गाडीमध्ये दोराच्या साहाय्याने जखडलेल्या अवस्थेत एकमेकांच्या पायात पाय अडकलेले असे बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर बैलांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. यावेळी पिकअप चालक मतीन मेहमूद मुलतानी (वय ३९ वर्षे रा. निहारखेडा ता. येवला) आणि त्याच्या सोबत असलेला दुसरा इसमास भिमराज वसंत जठार (वय ३० वर्षे रा. सायगाव ता. येवला) यांना ताब्यात घेतले असून ६ जनावरे आणि पीकप गाडी असा ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संजय ठाकरे (वय ५३ वर्षे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.