loader image
[ays_poll id=7]

नगर परिषदेच्या मालकीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरच्या नावावर व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण न हटवील्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Jul 1, 2023

मनमाड शहरातील पालिकेच्या मालकीचे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरवर असलेल्या बाबासाहेबांच्या नावाची विटंबना करून शॉपिंगमधील दुकानदारांनी नावावर अतिक्रमण केले आहे. सदर प्रकार निषेधार्थ असून पालिकेने यावर तातडीने कारवाई करत नावावर असलेले अतिक्रमण काढावे. नव्याने ठळक अक्षरात नाव टाकले जावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते अतुल वानखेडे यांनी पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. मनमाड हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पूनित झालेले शहर आहे. त्यामुळे मनमाड नगर पालिकेच्या वतीने आझाद रोडवर असलेल्या शॉपिंग सेंटरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सदर शॉपिंग सेंटर व्यावसायिक असल्याने तेथे व्यापाऱ्यांना गाळे देण्यात आलेले आहे. मात्र सदर गाळेधारकांनी आणि विशेषतः गुरुकृपा ड्रायफ्रुट या गाळेधारकाने बाबासाहेबांच्या नावावर आपले शेड उभारले आहे. त्यामुळे नाव दिसत नाही. सदर अतिक्रमण हे बाबासाहेबांच्या नावाची विटंबना करत असल्याने हे निषेधार्थ आहे. पालिकेला विनंती आहे. की सदर अतिक्रमण तातडीने काढून नाव मोकळे करण्यात यावे. तसेच सदर नाव हे ठळक अक्षरात रंगविण्यात यावे. सदर अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास आंबेडकरी समाज सोबत घेऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात अतुल वानखेडे यांनी दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.