loader image
[ays_poll id=7]

जे टी कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉक्टर दिन अनोख्या पद्धतीने साजरा

Jul 1, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
आज 1 जुलै 2023 डॉक्टर दिन येथील जे टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. माणसाच्या आयुष्यात डॉक्टरची भूमिका काय आहे तसेच आपल्या संस्कृतीत डॉक्टरांना देव का मानले जाते इत्यादींचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वतः शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत दवाखान्यात जावून भेट दिली. यामध्ये ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी भेट देवून डाॅ.ख्याती तुसे व आकांक्षा नेहरकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तेथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी असलेल्या विविध सुविधांविषयी माहिती दिली.त्याचबरोबर नांदगाव मधील प्रतिष्ठित डाॅ.आनंद पारख ,उदय मेघावत, सचिन अञे, संदिप पाटील यांच्या दवाखान्याना भेटदेवून डाॅक्टराना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी डॉक्टरांकडून विशेष असे मार्गदर्शन मिळाले. या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनी चावला सर व शाळेतील शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
या सुत्य उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, विश्वस्त महेंद्र भाऊ चांदिवाल, रिखबचंद कासलीवाल, जुगल किशोर अग्रवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, पालक, शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
.