loader image
[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

Jul 3, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

जे .टी .कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज 3 जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात व्यासांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मधुर आवाजातील प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी शाळेचे प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पवार, श्री विशाल सावंत, श्री गोरख डफाळ या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाल व श्रीफळ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे व शिक्षकांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितका शिक्षकांचा देखील असतो. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारामुळे माणूस घडतो. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश गुप्ता बोलत होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हातून केक कटिंग करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी स्कूलचे प्राचार्य श्री मनी चावला यांनी सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले.
संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा ,विश्वस्त जुगलकिशोर अग्रवाल रिखबचंद कासलीवाल ,महेंद्रभाऊ चांदिवाल यांनी गुरूपौर्णिमेच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.