loader image
[ays_poll id=7]

लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड महाविद्यालयात वृक्षारोपण

Jul 4, 2023


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी लोकनेत्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या शैक्षणिक संस्थांच्या जडणघडणीमध्ये लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी नेत्र दीपक प्रगती केली.६ महाविद्यालय, अनेक माध्यमिक शाळा तसेच गरीब मुलांसाठी वस्तीगृह काढून ज्ञानगंगा सर्वसामान्यांपर्यंत पोचविली. सन १९६९ मध्ये मनमाड महाविद्यालयाची स्थापना लोकनेत्यांनीच असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतून व्यक्त केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे (बोडखे), वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य प्रशांत बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप ढमाले यांनी केले तर वृक्षरोपण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. बी परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व जनसंपर्क विभाग यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.