loader image
[ays_poll id=7]

गंगाधरी येथील हनुमान मंदिर खैरनार वस्ती येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न

Jul 12, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गंगाधरी येथील खैरनार वस्तीवरील हनुमान मंदिर येथे सभामंडप देण्यात आला. या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या वेळी शाल व पुष्पगुच्छ देत आमदार सुहास आण्णा कांदे यांचे स्वागत करण्यात आले. श्री विष्णू निकम सर यांनी या वेळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू असून 1200 कोटी रुपये निधी आमदारांनी खेचून आणला जे या आधी कोणत्याही आमदाराला शक्य झाले नसल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना विकास कामांसाठी कोणतीही शंका मनात न ठेवता केंव्हाही मला सांगा मी आपल्या सेवेत हजर असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले. येथील ग्रामस्थांच्या मागणी नुसार येथील खैरनार वस्ती ते खैरे वस्ती, खैरे नगर अंतर्गत रस्ता व स्मशानभूमी चे काम लवकरच करून दिले जाईल असे आश्वासीत केले. आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राजकीय कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करायला संकोच करू नका, मी आपल्याला सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी श्री विष्णू निकम सर, डॉ.वाय.पी.जाधव, प्रमोद भाबड, गंगाधरी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश खैरनार, दिगंबर भागवत, वसंतराव सोनवणे, नंदू खैरनार, सुनील जाधव, अशोक खैरनार , गणेश खैरनार , डॉ.मधूकर खैरनार, संदीप खैरनार, दीपक खैरनार, संजय खैरनार , वैभव खैरनार , बाळकृष्ण खैरनार, महेश इघे, सोपान जाधव, वसंतराव खैरनार, शिवाजी खैरनार महेंद्र गायकवाड, महेश ईघे,विजय ईप्पर, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन भगीरथ जेजुरकर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.