loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात डॉ. स्मिता प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

Jul 14, 2023

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्ष डॉ.स्मिता प्रशांत हिरे यांचा वाढदिवस महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी आपल्या मनोगतातून हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे महत्त्व व गरज विशद केली. या शिबिरात विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जी. एल. शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे, पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पी.बी परदेशी, प्रास्ताविक डॉ जे डी वसईत तर आभार प्रदर्शन महिला विकास समिती अध्यक्ष प्रा कविता काखंडकी यांनी केले. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी पवन राऊत, लॅब टेक- सिमोन स्वामी, वाल्मीक अहिरे, प्रशांत सोनवणे व महाविद्यालयाची विद्यार्थिनी पायल आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास समिती, व जनसंपर्क विभाग यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-प्राचार्य मुकेश मिसर हे होते. कार्यक्रमाच्या...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड महाविद्यालयास...

read more
बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
.