loader image
[ays_poll id=7]

श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर नांदगाव येथील विशाल सभामंडपाचे लोकार्पण संपन्न

Jul 14, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथील विशाल सभा मंडपाचे लोकार्पण आज आ. सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आ. कांदे यांच्या माध्यमातून ६०लाख रुपये निधीतून सदर सभा मंडप उभारण्यात आला आहे.

येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंग व अभंगाच्या उच्चारत आ. सुहास अण्णा कांदे यांचे स्वागत केले.

याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब श्री विष्णू निकम सर प्रमोद भाबड अमोल नावंदर दीपक मोरे सावता उत्सव समितीचे राजाभाऊ मोरे प्रशांत खैरनार सतीश गायकवाड बाळासाहेब मोकळ आदि उपस्थित होते.

सावता महाराज उत्सव समितीतर्फे आ. कांदे यांचा सत्कार करण्यात आला.
राम कथाकार रामप्रियादीदी यांचा सत्कार आ . कांदे यांनी केला
याप्रसंगी बोलताना श्री विष्णू निकम सर यांनी आ. कांदे यांचे आभार मानले तसेच आजपर्यंत अण्णांनी समाजासाठी खूप काही दिले आहे आणि अजूनही देण्याची तयारी दाखवत आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी आपल्या भाषणात आ. कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघात प्रत्येक जाती धर्माच्या
लोकांना न्याय देत मोठे विकास कार्य होत असल्याचे सांगितले.

आ. कांदे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघात करीत असलेला विकास हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो कारण आपण मला मत दिले आहे आणि या मताला जागणे माझे कर्तव्य आहे असे सांगितले, सावता कंपाउंड येथे आज पर्यंत अनेक वेळा आलो असताना सप्ताह काळात पावसामुळे होणारे हाल मी पाहिले आहे . आणि म्हणूनच साठ लाख रुपयांचा सभा मंडप तात्काळ मंजूर करून दिला यापुढेही पन्नास लाख रुपये देतो या संपूर्ण परिसराचा विकास करून घ्यावा जेणेकरून समाजातील गरजवंत कुटुंबांना या वास्तूचा लाभ होईल, या ठिकाणी मोठे सप्ताह संपन्न होतील असे सांगितले.
पाच महिन्यातच हा विशाल सभा मंडप बांधून तयार झाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला
याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यांना उद्देशून आमदार यांनी येत्या वर्षभरात नांदगावकरांच्या प्रत्येक घराघरात २४ तास नळाला पाणी येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी सावता महाराज उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.