loader image
[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित शालेय स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद….

Jul 17, 2023

मनमाड : योगेश म्हस्के – गेल्या 28 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये स्वामी विवेकानंद व्याखानमालेसह विविध उपक्रमांचे आयोजन करून शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,या स्पर्धेस शहरातील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुकर व्हावी या हेतुने 5 वी ते 10 विच्या मनमाड मधील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध विषयांच्या स्पर्धेचे आयोजन रविवार छत्रे हायस्कुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भावगीत आणि देशभक्ती गीत , 6 वी हस्ताक्षर , 7 वी चित्रकला , 8 वी प्रश्नमंजुषा , 9 वी निबंध , 10 वी सामान्यज्ञान स्पर्धांचे विविध विषय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले होते. शहरातील विविध शाळेतील एकुण 430 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहुन या शालेय स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये संख्यात्मक सहभाग जास्त असणाऱ्या शाळेला सन्मान चिन्ह देऊन आणि यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
.