भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
के आर टी हायस्कूल तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश
मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत १४ .१७ वर्ष...











