भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम
नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन...











