भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
अज्ञाताने लावली मक्याला आग ; भार्डी येथील घटना – शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
मनमाडहुन जवळच असलेल्या भार्डी या गावातील शेतकरी विनोद सरोदे यांच्या मळ्यात झाकून ठेवलेल्या २५...











