मनमाडहुन जवळच असलेल्या भार्डी या गावातील शेतकरी विनोद सरोदे यांच्या मळ्यात झाकून ठेवलेल्या २५ ट्रॉली मकापैकी ५ ते ६ ट्रॉली मक्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा प्रकार घडला आहे यात संपूर्ण मका जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाडनजीक असलेल्या भार्डी येथील तरुण शेतकरी विनोद सरोदे यांनी त्यांच्या मळ्यात जवळपास २५ ते ३० ट्रॉली मका बिट्या काढून ठेवल्या होत्या. यातील जवळपास पाच ते सहा ट्रॉली मका कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली. सरोदे रात्री अकराच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता
सदर
प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ घरातील लोकांना उठवून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने आग लागलेल्या मक्याला बाजूला करत उर्वरित मक्का वाचाविला.सरोदे यांचे जवळपास दीड लाख रुपये नुकसान झाले. याबाबत सरोदे यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.