भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सर्व मशिदिंमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे : फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख यांची मागणी
मनमाड: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून लहान लहान मुलांपासून तर अनेक वयोवृद्ध...











