loader image
[ays_poll id=7]

आधुनिक पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न

Jul 20, 2023

नांदगाव – सोमनाथ घोंगाणे

येथील जे .टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आधुनिक पध्दतीने घेण्यात आली. आधुनिक ऑनलाईन पद्धतीने मतदान करून शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.
भारत हा जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही असलेला प्रजासत्ताक देश आहे आपण गावापासून ते देशापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया राबवीत असतो अगदी अशाच पद्धतीची निवडणूक प्रक्रिया जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्येही शालेय मंत्रिमंडळ प्रस्थापित करण्यासाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या पदांसाठी शालेय विद्यार्थी रिंगणात उभे होते. यावेळी निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा उत्साह अवर्णनीय होता. तसेच मतदान करणाऱ्या विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षकही उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले होते.
संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल व सेक्रेटरी विजय चोपडा,जुगलकिशोरअग्रवाल , रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सुशील कासलीवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार, प्राचार्य मणी चावला, शिक्षक यांनी मतदान कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहून रेबीन कटकरून मतदान करत मतदानास सुरुवात केली. सदरील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून शाळेतील शिक्षक सुदर्शन चोळके, वासुदेव आहेर, रोशनी मॅडम यांनी काम पाहिले. शेवटी क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनी चावला सर उमेदवारासमक्ष निकाल जाहीर केला.
त्या मध्ये असे झाले खाते वाटप,शालेय मंञिमंडळ हेडबाॅय-यश शिंदे, हेड गर्ल- अनुष्का पगार , डेप्यूटी हेड बॉय- सार्थक, डेप्यूटी हेड गर्ल- गुण कवडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर होम मिनिस्टर, कल्चरल मिनिस्टर स्पोर्ट मिनिस्टर ,लिटरेरी मिनिस्टर ,डिसिप्लिन मिनिस्टर, हाऊस कॅप्टन (रेड ,ग्रीन ,येल्लो ,ब्ल्यू) या पदांवरही निवडून आलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना त्यांच्या जबाबदा-या समजावून सांगण्यात आल्या.
सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रा.मणी चावला यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.