loader image
[ays_poll id=7]

जैन मुनीच्या हत्येच्या निषेधार्थ नांदगाव जैन समाजाचा मुक मोर्चा

Jul 21, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

कर्नाटक येथील बेळगाव जिल्हातील चिकोडी येथील हिरेकुड आश्रमातील श्री १००८आचार्य कामकुमारनंद महाराज यांच्या निर्घृण हत्येच्या विरोधात सकल जैन समाज बांधवांनी विराट मुकमोर्चाचे आयोजन गुरुवार (दि २०) रोजी केले होते. सकाळी येथील जैन मंदिर येथून शहरातील प्रमुख मार्गाने जात जुन्या तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले.

कर्नाटक येथे श्री १००८आचार्य कामकुमारनंद महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेने भारत देशातील सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी जैन धर्म, जैन तीर्थक्षेत्र, सकल जैन समाजाच्या रक्षणाच्या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. येथील जैन मंदिर येथून मुकमोर्चाला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा नांदगाव पोलीस ठाण्यात तथा जुन्या तहसील कार्यालयात जवळ आल्यानंतर सभेत रुपांतर झाले. मोर्चात जैन बंधू भगीणी सह शहरातील बहुसंख्य नागरीक सहभागी झाले होते . यावेळी निषेध फलकावर ” मुनियो की सुरक्षा यही जैन समाज की मांग ” ” पहले शिखरजी अब मुनियोपर आघात नही सहेगा जैन समाज ” अशा आशयाचे फलक व काळया फिती लावून निषेध करण्यात आला . यावेळी दत्तराज छाजेड यांनी बोलतांंना सांगितले की, देशातील एका जैन संताची निर्घृण हत्या खेदजनक आहे. अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. सरकारने याचा सखोल विचार करून साधूंच्या संरक्षणासाठी कायदा करावा. यावेळी महावीर पारख, संतोष गुप्ता, सुनील जाधव, सुशिल कासलीवाल, मनोज चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले. जैन समाजातील युवकांनी या घटनेचा संताप व्यक्त केले आहे. सकल जैन समाजाच्या  बंदच्या हाकेला शहरातील छोटे ,मोठे ,व्यापारी व
राजकीय, सामाजिक, संघटनांनी पाठिंबा दिला होता. तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे व पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या मुकमोर्चात सकल जैन समाजातील नांदगाव/ साकोरा / बोलठाण / न्यायडोंगरी / जातेगाव / लोणी येथील सर्व संघटना ं पत्रकार संघ’ सावता महाराज उत्सव समिती ‘ विविध पक्षाचे कार्यकर्ते तसेच महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.