loader image

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

Jul 22, 2023


मनमाड – येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी अजय जैन याच्यासह अक्षय छाजेड या दोहोंना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून मनमाड शहरातून ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

येवला शहरात असलेल्या (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे कर्मचारी अशांनी संगनमत करून खातेदार व ठेवीदारांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांच्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची २१ कोटी ९६ लाख ९९ हजार ८५० रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा

घडल्यापासून फरारी होता. त्याला अटक करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नेमणूक केली होती. अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लपत होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजय जैन हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे समजले असता तातडीने पथक रवाना करण्यात आले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी भागात त्याचा शोध घेतला असता तो मनमाड शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून मनमाड शहरातील माधवनगर भागातून अजय जैन (छाजेड), अक्षय रवींद्र छाजेड (दोघेही रा. येवला) यांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे पुढील तपास करीत आहेत.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.